मुंबईच्या लोकल ट्रेन चा प्रवास म्हणजे अनुभवांची साखळीच असते....दर प्रवासात काहीना काही अनुभवायला,शिकायला मिळत...कधी ते अनुभव चेहऱ्यावर हसू आणतात तर कशी लोकांची मानसिकता पाहून हतबल व्हायला होत...असाच एक अनुभव आज ट्रेन मध्ये आला.
माझ्या समोरच्या सीटवर बसलेली एक बाई...मांडीवर एक दीड दोन महिन्यांची मुलगी...सोबत एक साधारण दीड-२ वर्षांची आणि ५-६ वर्षांची अशा अजून दोन मुली...तिच्याच...बर तिची आर्थिक परिस्थिती पण बेताचीच वाटत होती.आधी दोन मुली असताना गर्भधारणेचा अजून एक चान्स त्या बाईला का घ्यावासा वाटला? म्हणजेच तिला, तिच्या घरातल्यांना so called "वंशाचा दिवा" पाहिजे असणार हे निश्चित होत...माझ विचारांचं चक्र सुरु झाल होत एव्हाना...कधी संपणार हे सार...कधी कळणार लोकांना आपली नैतिक, सामाजिक जबाबदारी...बर जो वंश आपण वाढवू पाहतोय त्याच्या पूर्वजांनी त्यांच्या भावी वंशाच्या सदृढ- सुखी आयुष्याची तरतूद केली आहे का? मला कोणाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलण्याचा हक्क नाही...परंतु आपण जन्माला घालणाऱ्या मुलाला जर चांगल अन्न, आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयीच नाही देऊ शकत तर मग काय अर्थ उरतो या साऱ्या धडपडीला...
विचारांची साखळी तोडणारा एक आवाज कानी पडला....शेजारी बसलेल्या एका बाईने त्या तीन मुलींच्या आईला "तिन्ही मुलीच का?" असा प्रश्न विचारला..."हो" उत्तर देताना त्या बाईच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव नजरेतून सुटू शकले नाही..माझे विचार आत्ता दुप्पट वेगाने फिरू लागले....
कुठे आहोत आपण ? कधी थांबणार हे सार ? कधी घडणार प्रबोधन ? का स्त्रीलाच स्त्री नको असते ? भार वाटते ? असे असंख्य प्रश्न... माध्यमाचा वाढता प्रभाव...त्यांद्वारे राबवलेली सरकारची स्त्री भ्रूण हत्येविरोधी मोहीम...या पार्श्वभूमीवर ट्रेन मधला हा प्रकार म्हणजे so called liberal आयुष्य जगणाऱ्या, बदल घडत आहे अशी धारणा असणाऱ्या माझ्यासारखीला धक्कादायक होता.
मग हळूहळू या प्रश्नांची उत्तरे शोधायला लागले...ज्या स्त्रियांमध्ये हा संवाद घडला त्या मुळातच शिक्षण, त्यातून घडलेले सकारात्मक,आधुनिक बदल यांपासून काही वंचित राहिलेल्या गटामध्ये मोडणाऱ्या होत्या.घरी केबल नेटवर्क जरी असले, तरी त्याचा वापर स्त्रीला गौण लेखणाऱ्या, अन्याय करणाऱ्या, सोशिक स्त्री उभी करणाऱ्या मालिकाच पाहण्यासाठी केला जात असणार.मग अशा समाज घटका पर्यंत स्त्री साठी राबवली जाणारी मोहीम पोहचत तरी असेल का? इंटरनेट,सोशल नेट्वर्किंग साईट्स हे शब्दच ज्यांच्या गावी नाहीत त्यांना समाजातील या प्रबोधनाचे काय कौतुक?
खरतर "वंशाचा दिवा " ही आपल्या समाजाला लागलेली अनेक वर्षापासूनची अळी आहे.तिने समाज हितवादी विचारांना इतके पोखरले आहे कि आत्ता त्यातून समाजाची सुटका करायची असेल तर पार तळागाळापर्यंत प्रबोधन पोहोचणे आवश्यक आहे.त्यासाठी सरकारने अधिक व्यापक धोरण स्वीकारणे गरजेचे आहे.आणि म्हणूनच माध्यमाच्या प्रत्येक अंगाचा वापर होणे अपरिहार्य आहे.माध्यमाचे पारंपारिक प्रकारही या मोहिमेत मोठे योगदान देऊ शकतात.हे ध्यानात घेऊनच वृत्तपत्रे, होर्डींग्स,रेडीओ, सार्वजनिक भिंतींचा वापर तसेच वाहिन्यांवर जनहितार्थ राबवल्या जाणाऱ्या जाहिराती अशा माध्यम अंगांचा जास्तीत जास्त वापर करून घेणे अनिवार्य आहे.
कारण जर संवादातून होणारा माहितीचा प्रसार सर्वदूर व्हावयास हवा असेल तर तो समाजातील प्रत्येक स्तरांत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे.आणि तरच परिपूर्ण संवाद घडून प्रबोधन घडण्यास मदत होईल!!!

No comments:
Post a Comment